सिडकोतील प्रलंबित प्रश्‍न सोडवा; मंत्री एकनाथ शिंदेंकडे चंद्रकांत खैरेंची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant khaire

सिडकोचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे

सिडकोतील प्रलंबित प्रश्‍न सोडवा; मंत्री एकनाथ शिंदेंकडे खैरेंची मागणी

औरंगाबाद: शहरातील सिडकोचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. शिवसेनेसह नागरिकांच्या शिष्टमंडळाने श्री. शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, सिडको एन-४ सेक्टरमधील विहिरीची जागा सिडको विभागाकडून पोलीस स्टेशनसाठी देण्यात आली आहे. पण नागरिकांचा त्याला विरोध आहे. या विहिरीत गणेश विसर्जन केले जात होते. विहिरीच्या काठावर दत्त मंदिराची व हनुमान मंदिराची स्थापना करण्यात आली त्यामुळे जागा वाटपाचा निर्णय रद्द करावा, यासह इतर मागण्या करण्यात आल्या.

यावेळी श्री. खैरे यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेत सिडकोच्या जागा नाममात्र दराने मंदिर ट्रस्टना द्याव्यात, मालमत्ता पूर्णपणे फ्री होल्ड करण्यात याव्यात, हा निर्णय होईपर्यंत मालमत्ता हस्तांतरणासाठी लावण्यात येणारे शुल्क कमी करावे. हस्तांतरण शुल्क ५० टक्के कमी करून मालमत्ता फ्री होल्ड होईपर्यंत त्यात वाढ करू नये. मालमत्तेवरील बंधने शिथिल करावेत, यासासह विविध मागण्या करण्यात आल्या. ॲड. आशुतोष डंख, शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, उपशहरप्रमुख शिवा लुंगारे, बजरंग विधाते, साहेबराव घोडके उपस्थित होते.

Web Title: Chandrakant Khaire Cidco Pending Work Eknath Shinde

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..