esakal | चंद्रकांत खैरे यांनी शहराची वाट लावली...कोणी केला आरोप, वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे नौटंकीबाज आहेत. आतापर्यंत ते या शहराला पाणी देऊ शकले नाहीत. ज्या ठिकाणी ते राहतात तेथेही लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, असा आरोप सुभाष पाटील यांनी केला.

चंद्रकांत खैरे यांनी शहराची वाट लावली...कोणी केला आरोप, वाचा...

sakal_logo
By
राजेभाऊ मोगल

औरंगाबाद- नगरसेवक, २० वर्षे खासदार, पाच वर्षे आमदार आणि मंत्री राहिलेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे नौटंकीबाज आहेत. आतापर्यंत ते या शहराला पाणी देऊ शकले नाहीत. ज्या ठिकाणी ते राहतात तेथेही लोकांना प्यायला पाणी मिळत नाही. अशी अवस्था केल्यामुळेच लोकांनी त्यांना नाकारले आहे. आता आपल्याला आमदारकी, खासदारकी मिळावी, म्हणून ते पीकपाणी अशा परिषदा घेत आहेत. असली नौटंकी त्यांनी आता बंद करावी, अशी टीका मराठवाडा विकास सेनेचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी केली आहे. 

ठळक बातमी : सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय होणार बंद ? 

लोकांना पाणी प्यायला नाही
मराठवाड्याच्या प्रश्‍नांच्या अनुषंगाने श्री. पाटील यांनी सोमवारी (ता.२४) पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले, ‘‘ग्रामीण भागात लोकांना पाणी प्यायला नाही. या शहराची तीनशे कोटींची योजना केवळ चंद्रकांत खैरे यांच्या पापामुळे सोळाशे कोटींवर गेली. या शहराला आशिया खंडामध्ये सगळ्यात जास्त पाण्याचा जास्त भार द्यावा लागत आहे. तो चंद्रकांत खैरे यांच्यामुळे आणि हे सगळं होत असताना निर्लज्जपणासारखे खासदारकी, आमदारकी मिळविण्यासाठी पाणी परिषद घेतली आहे. त्यांनी अशी नौटंकी बंद करावी आणि खुशाल घरी बसून राहावे, मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, ही आपली भूमिका आहे. जो माणूस आपल्याला पाणी देऊ शकत नाही, आपल्या गल्लीत पाणी देऊ शकत नाही तो आता काहीच करू शकत नाही. 

क्‍लिक करा : बेगमपुरा - पहाडसिंगपुरा वॉर्डाला तीर्थक्षेत्राचा दर्जा

खैरे यांचे मौन
मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर मी ग्रामीण भागामध्ये दौरा करणार आहे. शिवाय लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी करणार आहे,’’ असेही श्री पाटील यांनी सांगितले. दरम्यान, श्री. पाटील यांच्या आरोपावर श्री. खैरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 

loading image