लोकसभा निकालाआधीच दक्षिणमुखी मारुती मंदिरात चंद्रकांत खैरेंकडून 'महायज्ञ'; छ. संभाजीनगरवर कोणाचं राहणार वर्चस्व?

लोकसभा निवडणुकीचा निकाल आमच्याच बाजूने लागेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
Dakshinmukhi Maruti Mandir
Dakshinmukhi Maruti Mandiresakal
Summary

या मंदिरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा पत्नीसह अधून मधून भेट देत असतात.

दौलताबाद : लोकसभा निवडणुकीचा निकाल आमच्याच बाजूने लागेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आमची दक्षिणमुखी मारुतीरायावर (Dakshinmukhi Maruti Mandir) जास्त श्रद्धा असून देव आम्हाला नक्की यश देईल, असा आम्हाला विश्वास आहे. निवडणूक काळात व निकालाच्या वेळी आम्ही इथं विशेष यज्ञाचं आयोजन करत असतो. त्यामुळं दक्षिणमुखी मारुतीराया आम्हाला चांगलं यश देईल, असा विश्वास माजी खासदार व शिवसेना ठाकरे गटाचे नेते, उमेदवार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी दक्षिण मुखी हनुमान मंदिरात व्यक्त केला.

Dakshinmukhi Maruti Mandir
महाबळेश्‍‍वर, पाचगणीतील हॉटेल्स, रिसॉर्ट्सवर कारवाई; साहित्‍यांसह मुलाबाळांना रस्त्यावर घेऊन येण्याची पर्यटकांवर वेळ!

देशातील व महाराष्ट्रातील सत्ता संघर्षकडं सर्व राज्याचं लक्ष लागून आहे. विविध प्रसार माध्यमांनी नुकताच निवडणूक पूर्व अंदाज व्यक्त केला. काही माध्यमांच्या सर्व्हेनुसार, छत्रपती संभाजीनगरची (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Result) जागा इंडिया आघाडीतील उबाठा गट जिंकणार असे संकेत दिले आहेत.

Dakshinmukhi Maruti Mandir
Dakshinmukhi Maruti Mandiresakal

त्याच अनुषंगाने मारुतीरायाचा आशीर्वाद पाठिशी राहावा यासाठी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आज (रविवार) दौलताबाद येथील पुरातन दक्षिणमुखी मारुती मंदिरात यज्ञाचे आयोजन केले आहे. या यज्ञाचे फलित सत्य वागणाऱ्याला शंभर टक्के मिळते, असे यावेळी ब्रम्हवृंद श्री मुळे गुरुजी यांनी सांगितले. शिवसेना व विशेष करून ठाकरे कुटुंबावर कुठलेही दुःखद क्षण आल्यास खैरे हे नेहमीच दक्षिण मुखी हनुमान मंदिरात पूजा पाठ यज्ञाचं आयोजन करत असतात, अशी माहिती मंदिरातील पुजाऱ्यांनी दिली.

Dakshinmukhi Maruti Mandir
Ganpatipule Temple : 'गणपतीपुळे देवस्थान परिसरातील मद्य, मांसविक्री करणारे रेस्टॉरंट बंद करा'; हिंदू समितीने का केलीये मागणी?

दरम्यान, प्रसिद्ध दक्षिणमुखी व नवगृह मंदिरात महायज्ञाचं आयोजन केलं होतं. ११ ब्रह्मवृदांच्या उपस्थितीत हा यज्ञ यशस्वी झाला. कुष्णाकांत मुळे यांच्या अधिपत्याखाली मंदिरात मागील एक महिन्यांपासून यज्ञ सुरू आहे. हनुमान मंदिरात खैरे यांनी आज सकाळी अकरापासून होम हवन पूजा सुरु केली आहे. ही पूजा आठ तास चालणार आहे. या मंदिरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा पत्नीसह अधून मधून भेट देत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com