
छत्रपती संभाजीनगर : खासगी असो वा सरकारी नोकरीसाठी चारित्र्य पडताळणी दाखला बंधनकारक झाला आहे. पडताळणीसाठी अर्ज केल्यानंतर अर्जदाराला पोलिस ठाण्याकडून क्राईम ॲण्ड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टिमद्वारे (सीसीटीएनएस) त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत की नाहीत, याची देखील पडताळणी करता येऊ शकते. ‘आपले सरकार’ पोर्टलवरूनदेखील ही सुविधा आहे. अर्जासोबत केवळ आधारकार्ड, पॅनकार्ड व एक फोटो लागतो. त्यानुसार संबंधिताला सात दिवसांत संबंधित पोलिस ठाण्याकडून दाखला दिला जातो.
चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. आपले सरकार पोर्टल किंवा चारित्र्य पडताळणीच्या पोर्टलवर जाऊन अर्जदाराने नोंदणी करावी लागते. नोंदणी करताना आपण ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो (शहरी किंवा ग्रामीण) त्याची निवड करावी. एकदा फॉर्म सबमिट केल्यास पुन्हा चूक दुरुस्त करता येत नाही. नोंदणीनंतर यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे लागते.
चारित्र्य पडताळणी हा पर्याय निवडल्यानंतर दोन प्रकारचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळतील. त्यात सर्वसामान्य चारित्र्य पडताळणी व सिक्युरिटी गार्डसाठी आणि परदेशात नोकरीला जाण्यासाठी किंवा इतर कारणासाठी चारित्र्य पडताळणी असे प्रकार आहेत. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर तो पोलिस ठाण्याकडून पोलिस अधीक्षक कार्यालय किंवा पोलिस आयुक्तालयातील शाखेत पाठवला जातो. या ठिकाणी अधिकृत संकेतस्थळावरून संबंधित व्यक्तीची पुन्हा एकदा पडताळणी होते. त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याची किंवा नसल्याची नोंद त्या दाखल्यावर केली जाते.
सात दिवसांत मिळणार कॅरेक्टर सर्टिफिकेट त्यानंतर तो अर्ज पुन्हा संबंधित पोलिस ठाण्याला पाठविला जातो.
प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या आहेत अटी
१) अर्जदार जेवढ्या कालावधीत संबंधित जिल्ह्यात वास्तव्यास आहे, तेवढ्याच कालावधीचा तेथील संबंधित पोलिस ठाण्याकडून चारित्र्य पडताळणी दाखला मिळतो.
२) त्यानंतर सध्या तो जेथे राहायला आहे, त्याठिकाणी अर्ज करून त्या कालावधीतील चारित्र्य पडताळणी दाखला त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतूनच घेऊ शकतो.
३) अर्जदार एखादा व्यक्ती जिवंत आहे की मृत, याची खात्री करण्यासाठी त्याला पोलिस ठाण्यातही बोलावून घेतले जाते. त्यानंतर सातव्या दिवसापूर्वीच चारित्र्य पडताळणी दाखला दिला जातो.
अर्जासाठी महत्त्वाच्या बाबी
-ऑनलाइन अर्जासाठी १२३ रुपये शुल्क आहे.
-चारित्र्य पडताळणी कशासाठी पाहिजे, त्याचे कारण नमूद करावे लागते.
-एखादी कंपनीला संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे की नाही याची खात्री करण्यासाठी दाखला मागते.
-पासपोर्ट काढताना अर्जदार व्यक्तीची चारित्र्य पडताळणी पोलिसांकडे केली जाते.
-एखादा व्यक्ती आपल्यावर गुन्हा दाखल आहे की नाही, याच्या खात्रीसाठीही दाखला काढू शकतो.
शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ज्या अर्जदारांनी अर्ज केले. त्यापैकी ऑनलाइन १३ हजार ५५ प्रमाणपत्र देण्यात आले असून ऑफलाइन १ हजार ३४४ प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.
- अशोक भंडारे,
वरिष्ठ पोलिस निरिक्षक, विशेष शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.