Chh. Sambhaji Nagar : शंभर एकरात भरणार बागेश्‍वर बाबांचा दरबार! डॉ. भागवत कराड उपक्रमाच्या नियोजनासाठी बैठक

कार्यक्रमासंदर्भात डॉ.कराड यांच्या संपर्क कार्यालयात सकल हिंदू समाजाची बैठक झाली.
bageshwar dham
bageshwar dham sakal

छत्रपती संभाजीनगर - आध्यात्मिक गुरु बागेश्वरधामचे बाबा पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्री यांचा छत्रपती संभाजीनगरात ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान दरबार भरणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सोमवारी (ता.९) केले.

कार्यक्रमासंदर्भात डॉ.कराड यांच्या संपर्क कार्यालयात सकल हिंदू समाजाची बैठक झाली. दसरा आणि दिवाळीच्या सणाच्या उत्साहामध्ये बाबांचा दरबार शहरात होणार असल्याने भक्तांसाठी पर्वणीच राहणार आहे. शंभर एकरात हा कार्यक्रम होईल. या दरबारात मोठ्या प्रमाणात भक्त उपस्थित राहतील. दरबारात किमान दहा लाख भाविकांची बसण्याची व्यवस्था करण्यात येत असून, त्या संदर्भात वेगवेगळ्या समित्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका या संदर्भातही नियोजन करण्यात येणार आहे.

बैठकीत प्रामुख्याने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, बैठक, वाहतूक व्यवस्था अशा वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस जगदीश बियाणी, महावीर पाटणी, राजू जहागीरदार, जयकुमार थानवी ,लक्ष्मण राठी ,आदेशपालसिंग छाबडा,बापू घडामोडे ,

bageshwar dham
Ludo च्या व्यसनापायी तिने स्वतःलाच लावलं पणाला; जे घडलं ते ऐकून नवरा हादरला!

कुलदीप सिंग मीर ,संजय सारडा दीपक कोलते, गजेंद्र राजपूत, युवराज डोंगरे ,अनिल वाघ ,अश्विनी ईलवार संगीता शर्मा, मुकेश सावजी ,सुधीर सावजी, कैलास बाफना, विजय जयस्वाल, माहेश्वरी युथ क्लबचे कुणाल मंत्री, नवल किशोर जाजू संजय मंत्री, विजय जयस्वाल, राजकुमार राजेंद्र लोहिया शिवदत्त राठी, संतोष दिलीप अग्रवाल ,भरत यादव, राहुल निकम, संजय सारडा ,मयूर वर्मा ,आनंद शांतीलाल वर्मा, आशिष अग्रवाल ,मंगला बनसकर राजेंद्र शर्मा ,दीपक कोलते, श्यामसुंदर जनार्धन बसवार विजयकुमार देवीचंद बाहेती ,किशोर खंडेलवाल सोमनाथ तांबे ,युवराज डोंगरे, अनिल वाणी, मदन राजपूत उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com