Chh. Sambhaji Nagar : पाणीपुरवठ्यातील विघ्न कायम;वीजपुरवठा खंडित झाल्याने पुरवठा पुन्हा विस्कळित

जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात अचानक फुटली.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर - पाणीपुरवठ्यातील विघ्न कायम असून फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात तीन दिवसांपासून ७०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती सुरू आहे. तर शनिवारी (ता. २३) जायकवाडी पंपगृहाचा वीज पुरवठा काही काळ अचानक खंडीत झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे जुन्या शहरातील पाण्याचे टप्पे एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले असून त्याचा परिणाम नवीन शहराच्या पुरवठ्यावरही झाला आहे.

जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात अचानक फुटली. त्यामुळे शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दुपारी काही काळ जुन्या शहराचा पुरवठा बंद होता. त्यामुळे या भागातील शुक्रवारचे काही टप्पे शनिवारी तर शनिवारचे संपूर्ण टप्पे रविवारी देण्यात आले आहेत.

जायकवाडीहून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० आणि १४०० मि.मी. व्यासाच्या दोन्ही जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. त्यातून पाण्याचा थोडा दाबही वाढला की, गळती सुरू होऊन जलवाहिनी फुटण्याची घटना घडते. गौरी-गणपती उत्सवात शहरवासियांना नियमित पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा दावा महापालिका पाणीपुरवठा विभागाने केला. त्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी फिरते पथक, जलकुंभांवर बैठे पथक २४ तास सज्ज ठेवण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते.

sambhaji nagar
Chh. Sambhaji Nagar : खा. इम्तियाज जलील यांच्या पुतळ्यास भरल्या बांगड्या

मात्र, असे असतानाही मागील तीन दिवसांपासून जून्या शहराचा पाणीपुरवठा सतत विस्कळीत होत आहे. शुक्रवारी फारोळ्यातून ७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीला अचानक गळती सुरू झाली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी ही गळती रोखण्यासाठी जलवाहिनीवर क्लॅम लावला. परंतु, पाण्याचा दाब अधिक असल्याने क्लॅममधूनही मोठ्या प्रमाणात गळती सुरूच होती. त्यामुळे पुन्हा शहराच्या दिशेने होणारा पुरवठा बंद करण्यात आला.

sambhaji nagar
Chh. Sambhaji Nagar : जिल्ह्यातील १२८ शाळांवर टांगती तलवार

शनिवारी जलवाहिनीच्या गळतीचे प्रमाण वाढल्याने दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. परंतु, दुरुस्ती काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यादरम्यान ७०० ऐवजी १४०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून जून्या शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला. परंतु, पाण्याचा दाब कमी असल्याने जलकुंभाला लेव्हल न आल्याने अनेक भागांना ६ दिवसानंतरही पाणी मिळू शकले नाही.

अखेर रविवारी फारोळ्यातील गळती दुरुस्ती पूर्ण करून दुपारनंतर शहराच्या दिशेने पुरवठा सुरू करण्यात आला.  यामुळे ऐन गणेशोत्वातही जिन्सी, शहागंज, विश्वभारती कॉलनी, जुब्लीपार्क यासह काही भागातील जलकुंभातून होणार पुरवठा विस्कळीत झाला होता. 

sambhaji nagar
Chh. Sambhaji Nagar : शहरावर आता ड्रोनची नजर

गळती बंद करण्याचे कामे पूर्ण फारोळ्यातून ७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीद्वारे शहराच्या दिशेने पाणीपुरवठा सुरू असताना तीन दिवसांपूर्वी अचानक जलशुद्धीकरण केंद्रातील पाइपला मोठी गळती सुरू झाली. त्याला क्लॅम्प लावून तात्पुरती दुरुस्ती केली. परंतु, त्यानंतर पुन्हा गळती वाढल्याने रविवारी सकाळी दुरुस्तीचे काम सुरू केले. काही काळ पुरवठा बंद ठेवण्यात आला. ही दुरुस्ती दुपारी पूर्ण झाली असून पुरवठा देखील सुरू करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com