Chh. Sambhaji Nagar : शहरात २१ ठिकाणी ‘हायफाय’ स्वच्छतागृहे; नऊ कोटींचा खर्च, वाहनांच्या चार्जिंगचीही असेल सुविधा

यातील ११ स्वच्छतागृहांच्या बांधकामासाठी कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.
washroom
washroom sakal

छत्रपती संभाजीनगर - शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहाची वानवा असल्यामुळे महापालिका प्रशासनावर अनेक वर्षांपासून टीका होत आहे. त्यामुळे महापालिकेने शहराच्या विविध भागात २१ स्मार्ट स्वच्छतागृहे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

यातील ११ स्वच्छतागृहांच्या बांधकामासाठी कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित दहा स्वच्छतागृहांसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, या प्रकल्पावर नऊ कोटी ३६ लाख रुपये खर्च निधी खर्च केला जाणार आहे. ई-चार्जिंग, वायफायची सुविधा येथे राहणार आहे.

शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. विशेषतः मुख्य बाजारपेठेच्या भागात स्वच्छतागृह नसल्याने खरेदीसाठी आलेल्या महिलांची कुचंबणा होते. त्यामुळे प्रशासक जी. श्रीकांत यांनी अत्याधुनिक सुविधा असलेले स्वच्छतागृह बांधण्याचे नियोजन केले आहे. केंद्र शासनाच्या च्या स्वच्छता अभियानांतर्गत पाच कोटी खर्च करून ११ अत्याधुनिक स्मार्ट स्वच्छतागृह उभारले जाणार आहेत.

washroom
Solapur : पोटचा गोळा गेल्याचं डोंगराएवढं दु:ख आवरून मुलाचे नेत्रदान

त्यासोबतच राज्य शासनाकडून मिळालेल्या दोन कोटी रुपयाच्या निधीतून पाच उड्डाणपुलाखाली व स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत पाच स्वच्छतागृह असे २१ स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे. यातील ११ स्वच्छतागृहांसाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.

उड्डाणपुलाखाली बांधल्या जाणाऱ्या स्वच्छतागृहांसाठी निविदा अंतिम केली जाणार आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानातील पाच स्वच्छतागृहासाठी निविदा उडण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या ठिकाणी सोलार पॅनल, ई-वाहनांसाठी चार्जिंग पॉइंट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, केअरटेकरसाठी स्वतंत्र रूम असेल.

washroom
Nagpur : एसटीच्या ताफ्यात स्लीपर बस दाखल

अशा आहेत जागा

शासकीय कर्करोग रुग्णालय, पीर बाजार, कांचनवाडी, सिद्धार्थ उद्यान, कबीरनगर, डॉ. सलीम अली सरोवर, पिया मार्केट, सिडको एन-११ भाजीमंडई, नेहरू गार्डन अण्णा भाऊ साठे चौक, क्रांतीनगर, सिडको एन-१ सिग्नल (एसबीआय बँकेजवळ पाणपोई). तसेच टाऊन हॉल, मोंढा नाका, रेल्वेस्टेशन, एपीआय कॉर्नर, संग्रामनगर या पाच उड्डाणपुलाखाली व पाणचक्की, शहागंज भाजीमंडई, औरंगपुरा भाजीमंडई, औषधीभवन, मुकुंदवाडी भाजीमंडई.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com