Chh. Sambhaji Nagar : महानोर यांच्यामुळेच गावाला 'खरी' ओळख; ग्रामस्थांनी व्यक्त केल्या भावना

अजिंठा-सोयगाव परिसरातीमधील डोंगर, दऱ्याखोऱ्यातील निसर्ग तसेच पर्यावरणाचे वर्णन ना. धो. महानोरांनी आपल्या कविता संग्रहातून मांडल्या.
Chh. Sambhaji Nagar
Chh. Sambhaji NagarSakal

Chh. Sambhaji Nagar, सोयगाव - पद्मश्री पुरस्‍कारप्राप्त तथा निसर्ग कवी ना.धो. महानोर यांचे गुरुवारी पुण्यात निधन झाले. हे वृत्त कळताच अख्खे पळसखेडा (ता.सोयगाव) स्तब्ध झाले.

महानोर यांना गावात सर्वजण दादा म्हणून हाक मारत होते. या महान कवीमुळेच आमच्या गावाला नवी ओळख मिळाल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.

Chh. Sambhaji Nagar
Mumbai : केडीएमसी फेल, 27 गावे बाहेर काढा; आमदार राजू पाटील यांची मागणी

अजिंठा-सोयगाव परिसरातीमधील डोंगर, दऱ्याखोऱ्यातील निसर्ग तसेच पर्यावरणाचे वर्णन ना. धो. महानोरांनी आपल्या कविता संग्रहातून मांडल्या. साहित्य क्षेत्रातील रानकवीची साहित्य क्षेत्रातून विधानपरिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

दुर्गम भागातील व्यक्तिमत्त्व परंतु बुद्धिमत्तेच्या जोरावर ग्रामीण भागाला न्याय देणारे महानोर काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे सिल्लोड-सोयगावसह मराठवाड्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

- अशोक गरुड, प्राचार्य, सरस्वती विद्यालय तळणी (ता.सिल्लोड)

Chh. Sambhaji Nagar
Mumbai News: धक्कादायक! बोरीवलीतील सोसायटीच्या फ्लॅटमध्ये कुजलल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

दादांच्या साहित्याची रुची ग्रामीण भागात रुजावी. यासाठी गावात मोफत ग्रंथालय सुरू केले होते. मात्र, दादांच्या जाण्याने आता साहित्याची गोडी कशी रुजावी हाच प्रश्न गंभीर झाला आहे. त्यांच्यामुळेच आमच्या गावाला जगभरात ओळख मिळाली होती.

- विश्वनाथ थोरात (ग्रामस्थ)

महानोर दादा म्हणजे सोयगाव तालुक्याची पेटती ज्योत होती. या गावाला साहित्य लिखाणामुळे देशभर ख्याती मिळाली.

- पंकज जैन (ग्रामस्थ)

साहित्याचा बादशहा आता काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे अख्खे गाव शोकसागरात बुडाले आहे. गावाचा मुंबई दरबारी नाव लौकिक मिळवून देणारा तारा निखळला आहे.

- मनोज नेलपत्रे (ग्रामस्थ)

महानोर दादांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गाव पाणीदार करण्यासाठी दादांनी अनेक विकासाचे कामे केली आहे.

- सतीश जगताप (ग्रामस्थ)

Chh. Sambhaji Nagar
Mumbai News: धक्कादायक! बोरीवलीतील सोसायटीच्या फ्लॅटमध्ये कुजलल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

गावात भजनी मंडळाच्या माध्यमातून कवितेच्या आठवणी ताज्या होत होत्या भक्तीतून कवी असा हा हिरा निघून गेला आहे. यामुळे आमची न भरून येणारी हानी झाली आहे.

- नामदेव सोने (ग्रामस्थ)

दादांनी घालून दिलेला साहित्य जपणुकीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून ग्रंथपाल म्हणून काम करत असताना पोटाची चिंता न करता साहित्य व कविता संग्रह वाचकांना मिळावा. यासाठी ग्रंथालयाची जबाबदारी दादांनी मला दिली होती. ती चिरकाल टिकवून ठेवेल.

- मीराबाई थोरात (ग्रामस्थ)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com