Chh. Sambhaji Nagar : भरदिवसा लुटणारा चार तासांत जेरबंद ; वाळूजमध्ये खाम नदीकाठच्या मंदिर परिसरात प्रकार

तेवढ्यात शेजारीच दबा धरून असलेला एक अज्ञात युवक राठोड यांच्या जवळ आला.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

वाळूज - पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून मारहाण करीत रोख रक्कम व मोबाइलसह दुचाकी लंपास करणाऱ्या लुटारूच्या वाळूज पोलिसांनी चार तासात मुसक्या आवळल्या. विष्णू शिवाजी काळे (वय २७,रा.वाळूज ता.गंगापूर)असे संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, की बिडकीन तांडा (ता.पैठण) येथील विठ्ठल मोहन राठोड हे मंगळवारी(ता.२५) सकाळी वाळूजच्या खाम नदीकाठी असलेल्या महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यांनी दुचाकी (एम.एच.२० बी एस २३३७ ) मंदिराच्या दर्शनी भागात उभी केली होती. दर्शन घेतल्यानंतर राठोड हे घरी जाण्यासाठी आपल्या दुचाकीजवळ आले.

तेवढ्यात शेजारीच दबा धरून असलेला एक अज्ञात युवक राठोड यांच्या जवळ आला. ''तू पोलिसांना माहिती देतो का, थांब तुला दाखवतोच.''असे म्हणत त्या अनोळखी युवकाने दारूची बाटली फोडून धमकावत दुचाकीस्वार राठोड यांना बेदम मारहाण केली. नंतर त्यांचा मोबाइल, रोख रक्कम व दुचाकी हिसकावून घेत त्या अनोळखीने घटनास्थळावरून धूम ठोकली. स्वतःला सावरत त्यांनी वाळूज पोलिस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ६७ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याचा गुन्हा दाखल केला होता.

sambhaji nagar
Chh. Sambhaji Nagar : रोषणाई आठवड्यातच फिकी ; चार कोटींचा खर्च ,अनेक ठिकाणच्या लायटिंग पडताहेत बंद

पथकाने केली कारवाई

पोलिस निरिक्षण दिलीप गांगुर्डे यांनी लुटारूच्या शोधासाठी तातडीने पोलिसांचे एक पथक तयार केले. त्यात सहायक पोलिस निरिक्षक अमोल ढोले, उपनिरीक्षक संदीप शेवाळे, भगवान मुजगुले, सखाराम दिलवाले, विजय त्रिभुवन व सुधीर कांबळे यांचा समावेश होता. पथकाने वाळूज परिसरातून संशयावरून एका युवकास ताब्यात घेतले. सुरवातीला त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. लुटीतील दुचाकी, मोबाईल पोलिसांच्या स्वाधीन केला. अवघ्या चार तासात पोलिसांनी विष्णू काळेच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

sambhaji nagar
Chh. Sambhaji nagar : हॉस्पिटलमध्ये सहकाऱ्यानेच केला महिलेचा विनयभंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com