
छत्रपती संभाजीनगर : गेवराई (जि. बीड) पंचायत समितीच्या माजी सभापतीच्या पतीने अधिकाराचा गैरवापर करून पंचायत समितीच्या महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. दीपक प्रकाश सुरवसे (४४, रा. खांडवी, ता. गेवराई, जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे.