Chha.Sambhajinagar Crime: बिलासाठी अभियंत्याच्या कुटुंबावर हल्ला; कंत्राटदाराकडून मारहाण; डाॅक्टर पत्नीची सोनसाखळी हिसकावली

Engineer and Family Members Attacked at Home: छत्रपती संभाजीनगरमध्ये ४० लाखांच्या बिलावरून वाद; जलसंपदा विभागाच्या अभियंत्यासह पत्नी, भाऊ आणि वडिलांना मारहाण
Chha.Sambhajinagar Crime

Chha.Sambhajinagar Crime

sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर: चाळीस लाख रुपयांच्या सर्वेक्षणाच्या बिलाचा तिढा मिटविण्यासाठी थेट जलसंपदा विभागाच्या उपविभागीय अभियंत्याच्या घरापर्यंत पोचलेल्या कंत्राटदारासह तिघांनी अभियंत्यासह त्यांची डॉक्टर पत्नी, भाऊ आणि वडिलांना मारहाण केली. अभियंत्याच्या पत्नीचा मोबाइल हिसकावून तिच्या गळ्यातील सोनसाखळीही हिसकावली. हा प्रकार टिळकनगरातील निरंजन हाउसिंग सोसायटीत १८ सप्टेंबरच्या रात्री साडेनऊ ते पावणेअकराच्या दरम्यान घडला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. यात संदीप गोरे, आशिष वाघचौरे आणि अथर्व वाघचौरे अशी आरोपींची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com