Success Story: ईशान पाटील झाला भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट; संघर्ष, जिद्द आणि यश, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वप्नपूर्ती
Indian Army Lieutenant: छत्रपती संभाजीनगरच्या ईशान पाटीलने कठीण प्रशिक्षण पूर्ण करत भारतीय लष्करात लेफ्टनंट म्हणून स्वप्नपूर्ती केली. एनडीए आणि आयएमएतील चार वर्षांच्या मेहनतीनंतर त्याचा सैन्य अधिकारी होण्याचा प्रवास यशस्वी ठरला.
छत्रपती संभाजीनगर : परिस्थिती प्रतिकूल होती, तरी जिद्द, मेहनत आणि चिकाटीने शहरातील ईशान महेश पाटीलने स्वप्नपूर्ती केली. चार वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून तो भारतीय लष्करात लेफ्टनंट झाला.