Chh. Sambhajinagar: भरधाव कारने दुचाकीला उडवले, एक तरुण ठार; चिकलठाण्यात जालना रोडवर पहाटे ‘हिट ॲण्ड रन’, अपघातात तिघे जखमी
Chh. Sambhajinagar Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये हिट ॲण्ड रन अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. काळ्या रंगाच्या कारने चौघा दुचाकीस्वारांना उडविले.
छत्रपती संभाजीनगर : एकाच मोटारसायकलवर बसून निघालेल्या चौघा तरुणांना एका काळ्या रंगाच्या सुसाट कारने उडवल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला तर तिघे तरुण जखमी झाले. हिट ॲण्ड रनची ही घटना सोमवारी (ता. २५) पहाटे अडीचच्या सुमारास घडली.