Sat, March 25, 2023

Chhatrapati sambhajinagar : होळी, धुळवडीला पावसाची शक्यता
Published on : 6 March 2023, 2:49 am
छत्रपती संभाजीनगर : मुंबई प्रादेशिक हवामान विभाग येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.७) व बुधवारी (ता.८) हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
सर्व शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांचा (हरभरा, ज्वारी, गहू, मका, अद्रक, हळद इत्यादी.) ढीग मारून ताडपत्रीने झाकून ठेवावे. तसेच स्थानिक वातावरण बघून काढणी केलेल्या पिकांची मळणी करून धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे. काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा पावसात भिजणार नाही. याची दक्षता घ्यावी.
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
पाऊस चालू असताना जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. वादळात बाहेर पडणे टाळावे, असे पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्रातील जिल्हा कृषी हवामान केंद्रातून डॉ. किशोर झाडे यांनी कळविले आहे.