छत्रपती संभाजीनगर : शहरातील मोंढा नाका उड्डाणपुलावर शनिवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघाताने एका कुटुंबाचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त (Chhatrapati Sambhajinagar Accident) झालं. या दुर्घटनेत मामा आणि पाच वर्षांच्या चिमुकल्या भाचीचा मृत्यू झाल्यानंतर आता सात महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक माहिती समोर आली आहे.