
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतर्फे शहरात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सुमारे ११ हजार घरे बांधली जात आहेत. त्यात प्रकल्पग्रस्तांसाठी पाच टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे रस्त्यांसह विविध भागात महापालिकेच्या प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.