

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलन आणि वाहतुकीचे कंत्राट महापालिकेने गुजरातच्या कंपनीला दिले. एक एप्रिलपासून कंपनीचे काम सुरू होणार असून, या पार्श्वभूमीवर आयुक्त जी. श्रीकांत यांनी कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली. त्यात घरोघरी कचरा घेताना संबंधित मालमत्ताधारक कर भरतो किंवा नाही, याकडे लक्ष ठेवा. कर भरण्यासाठी नागरिकांना आवाहन करा, अशा सूचना केल्या.