Chhatrapati Sambhajinagar : शहराचा विकास आता पुस्तकबद्ध! ‘छत्रपती संभाजीनगर...आता थांबणार नाही’चे रविवारी प्रकाशन
City Development : छत्रपती संभाजीनगर शहरातील जलसंकट, स्वच्छता, आणि नागरी सुविधांच्या क्षेत्रातील विकास यांचा आढावा घेणारे ‘कॉफी टेबल बुक’ लवकरच प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात शहराच्या भव्य विकासकामांची आणि भविष्यातील मेट्रोसिटी होण्याच्या प्रवासाची झलक आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहर विकासाच्या नव्या गाथा निर्माण करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहरातील कामांचा आढावा घेणारे ‘छत्रपती संभाजीनगर...आता थांबणार नाही’ या ‘सकाळ’ने तयार केलेल्या ‘कॉफी टेबल बुक’चे रविवारी (ता. एक) प्रकाशन होणार आहे.