

Economic Offences Wing officials investigate the alleged online investment fraud involving the Get Way Help scheme.
ESakal
छत्रपती संभाजीनगर : ‘दहा हजारांची गुंतवणूक करा आणि अवघ्या २० दिवसांत २० हजार रुपये मिळवा! रोज दहा टक्के कमिशन आणि इतरांना गुंतवणुकीसाठी जोडल्यास अतिरिक्त मोबदला...’ अशा अवास्तव परताव्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना जाळ्यात ओढणाऱ्या आंतरराज्यीय आर्थिक फसवणूक रॅकेटचा आर्थिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. गोव्यातील कॅसिनोमध्ये गुंतवणूक केल्याचे सांगत ‘गेट वे हेल्प’ या ऑनलाइन साखळी योजनेतून फसवणूक केली जात होती. पैसे परत मागणाऱ्या शेतकऱ्याला हातपाय तोडण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी गुन्हे शाखेने कंपनीच्या एमडीसह दोन महिला एजंटांना अटक केली.