Chhatrapati Sambhajinagar: ‘पनीर की चीज ॲनालॉग?’ मेन्यू कार्डवर स्पष्ट उल्लेख बंधनकारक;जिल्हाधिकाऱ्यांचे अन्न व औषध प्रशासनाला आदेश
Paneer vs. Cheese Analog: छत्रपती संभाजीनगरमध्ये पनीर आणि चीज ॲनालॉग वेगवेगळे असल्याने मेन्यू कार्डवर स्पष्ट उल्लेख बंधनकारक. नियमाचे उल्लंघन केल्यास अन्न व औषध प्रशासन कठोर कारवाई करेल.
छत्रपती संभाजीनगर: पनीर आणि चीज ॲनालॉग हे दोन अन्नपदार्थ वेगवेगळे असून, दोघांचेही पोषणमूल्य वेगवेगळे आहे. याबाबत ग्राहकाला स्पष्ट कल्पना यावी, यासाठी मेन्यू कार्डवर तसा उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे.