Chhatrapati Sambhajinagar : कोट्यवधींच्या बोलार्ड खरेदीची फाइल गायब : स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी

बोला...कुठे गेले बोलार्ड?
chhatrapati sambhajinagar smart city cycle track bollard g shrikant g 20
chhatrapati sambhajinagar smart city cycle track bollard g shrikant g 20Sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरात सायकल ट्रॅक विकसित करण्यासाठी स्मार्ट सिटी अभियानामार्फत कोट्यवधी रुपये खर्च करून बोलार्ड खरेदी करण्यात आले होते. सुरवातीपासून या बोलार्डविषयी स्मार्ट प्रशासनाकडून लपवाछपवी सुरू आहे.

महापालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी किती बोलार्ड खरेदी केले? किती शिल्लक आहेत? त्याची फाइल कुठे आहे? अशा प्रश्‍नांची सरबत्ती अधिकाऱ्यांवर केली. मात्र, सध्या तीन हजार बोलार्ड शिल्लक आहेत, एवढीच जुजबी माहिती त्यांना देण्यात आली.

त्यावर तीन दिवसात यासंदर्भात माहिती द्या, अन्यथा चौकशी लावली जाईल, असा इशारा जी. श्रीकांत यांनी दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले. रस्त्यांवर सायकल ट्रॅक करण्यासाठी सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटी प्रशासनाने बोलार्ड खरेदी केले. या बोलार्डची खरेदी, ते कुठे ठेवण्यात आले?

chhatrapati sambhajinagar smart city cycle track bollard g shrikant g 20
Chhatrapati Sambhaji Nagar : सलग दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठ्यावर संकट; जायकवाडीत वीज खंडितचा परिणाम

कुठे वापरणार याविषयी गुप्तता पाळण्यात आली. दरम्यान काही रस्त्यावर बोलार्ड वापरून सायकल ट्रॅक करण्यात आले. काही दिवसातच नागरिकांनी हे बोलार्ड तोडून टाकले, त्यात सायकल ट्रॅकची देखील वाट लागली. जी-२० परिषदेच्या काळात मोठ्या संख्येने बोलार्ड बाहेर आले.

काही रस्त्यावर दुभाजक म्हणून तर काही रस्त्यावर लेफ्ट टर्न मोकळे करण्यासाठी या बोलार्डचा वापर करण्यात आला. दरम्यान मंगळवारी (ता. चार) स्मार्ट सिटी कार्यालयात झालेल्या बैठकीत जी. श्रीकांत यांनी बोलार्डचा विषय छेडला. काही ठिकाणी बोलार्ड अर्धवट अवस्थेत मोडून पडले आहेत, ते विचित्र दिसत आहेत, त्यामुळे ते बदलण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना केली.

chhatrapati sambhajinagar smart city cycle track bollard g shrikant g 20
Chhatrapati Sambhaji Nagar : संभाजीनगरमधील  सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात हलणार ‘पाळणा’!

किती बोलार्ड शिल्लक आहेत, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर एकही अधिकारी बोलण्यास तयार नसल्याने खरेदीची फाइल कुठे आहे? किती रुपये खर्च करण्यात आला? कोणाच्या आदेशाने ते खरेदी करण्यात आले?

अशी विचारणा जी. श्रीकांत यांनी केली. त्यानंतर तीन हजार बोलार्ड शिल्लक असल्याचे किरण आढे यांनी सांगितले पण इतर प्रश्‍नांचे उत्तरे त्यांना देता आली नाहीत. त्यामुळे तीन दिवसात यासंदर्भात माहिती द्या, अन्यथा चौकशी केली जाईल, असा इशारा जी. श्रीकांत यांनी बैठकीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

व्यापाऱ्यांनी केला होता विरोध

स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहरात सायकल ट्रॅकची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील पहिला सायकल ट्रॅक क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रोडवर करण्यात आला, पण या रस्त्यावरील व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे या सायकल ट्रॅकला ग्रहण लागले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.