

Chatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: मागील महिनाभरापासून शहरात जागोजागी कचऱ्यांची ढिगारे आढळून येत असून दुर्गंधी वाढली आहे. महापालिकेची घंटागाडी गल्ल्यांमधूनच कचरा संकलन करताना दिसते. मात्र, काही रस्त्यांवरील कचरा उचलण्याकडे यंत्रणा दुर्लक्ष करत आहे. यामुळे संबंधित ठिकाणी कचऱ्यांची ढिगारे दिवसेंदिवस पडून राहत असल्याचे चित्र आहे. रस्त्यांवरील हा कचरा उचलणार कोण, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.