शहरात विविध भागात चार दुचाकी चोरीला

शहरात विविध भागात चार दुचाकी चोरीला
Published on: 
शहरातून चार दुचाकींची चोरी छत्रपती संभाजीनगर, ता. ३ : शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये एन-पाच भागातील साने गुरुजी हाउसिंग सोसायटीतील सेवानिवृत्त उगलाल मंजू राठोड यांची एमएच २० डीबी ६५२८ क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तपास पोलिस हवालदार राठोड करत आहेत. दुसरी घटना जाधवमंडीमध्ये घडली. मनोज तजेराव बैलम (रा. राजूनगर, रेल्वे स्टेशन) यांची एमएच २० एफबी २९४५ क्रमांकाची दुचाकी अज्ञाताने लंपास केली. याप्रकरणी पुढील तपास पोलिस हवालदार कुबेर करत आहेत. तिसरी घटना एन-१२ परिसरातील सत्यविष्णू हॉस्पिटलच्या पार्किंगमधून कौतिकराव भिकाजी आढावे (रा. पिसादेवी रोड) यांची एमएच २० जीएक्स ६१५३ क्रमांकाची मोटारसायकल चोरीला गेली. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तपास सहायक फौजदार पाटील करत आहेत. चौथी दुचाकी चोरी ही शंभूनगर परिसरात घडली. सागर लक्ष्मण गवळी यांची एमएच २० एफएच ८३६४ क्रमांकाची दुचाकी चोरी झाली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तपास पोलिस हवालदार काळे करत आहेत. ------ सिडको एन-४ मधून कार चोरीला छत्रपती संभाजीनगर, ता. ३ : सिडको एन-४ कानिफनाथ कृपा या इमारतीतील घरासमोरील पार्किंगमधून पांढऱ्या रंगाची टोयोटा इनोव्हा क्रिस्टा कार चोरट्याने चोरून नेली. ही घटना १ नोव्हेंबरला सायंकाळी घडली. प्रतिभा किरण सानप (वय ४२) यांच्या मालकीची एमएच २० ईक्यू ००२८ क्रमांकाची कार चोरीला गेली. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला. तपास पोलिस हवालदार संदीप बीडकर करत आहेत. ---- दहावर्षीय बालकाचे अपहरण छत्रपती संभाजीनगर : पुंडलिकनगर परिसरातून दहावर्षीय बालकाचे अज्ञाताने अपहरण केल्याची घटना रविवारी (ता. एक) रात्री नऊच्या सुमारास घडली. बालकाची आई अलका कौतिक बडक (वय ३०, रा. आनंदनगर, गल्ली नं. १, गारखेडा परिसर) यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली. तपास पोलिस हवालदार बावस्कर करत आहेत. ------ तरुणी बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा छत्रपती संभाजीनगर : हर्सूल येथील राधास्वामी कॉलनी, जटवाडा रोड परिसरातील भाड्याच्या घरातून १८ वर्षीय तरुणीचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार दाखल झाली. वैष्णवी (वय १८) ही ईश्वर वसंत काथार यांच्या घरात भाड्याने राहत होती. तिचा भाऊ संकेत दीपक कोगदे (वय २१, रा. विहीगाव, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून हर्सूल पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद झाला. तपास पोलिस हवालदार ढाकणे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.