

Chhatrapati Sambhajinagar Water Crisis, Tanker Supply, Drought
Sakal
छत्रपती संभाजीनगर,: दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यातील काही भागांमध्ये सप्टेंबरपासूनच टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. ३० सप्टेंबरअखेर जिल्ह्यातील ७६ गावांना आणि २३ वाड्यांची तहान टँकरने भागवली जात आहे. या गावांमधील सुमारे १ लाख १४ हजार ४४४ लोकसंख्येला १२२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यात टँकरसाठी ७६ गावे व २३ वाड्यांमधून टँकरची मागणी झाली. या गावांसाठी टँकरच्या २३१ खेपा मंजूर आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात २१९ खेपा सध्यस्थितीत केल्या जात आहेत. मंजूर खेपांपेक्षा १२ खेपा कमी होत आहेत. पाणीपुरवठ्यासाठी शासकीय तसेच खासगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. वैजापूरमध्ये ३५,१६३ लोकसंख्येला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
यात १३ गावे आणि ३ वाड्यांचा समावेश असून, मंजूर ४१ खेपांपैकी सर्व ४१ खेपा प्रत्यक्ष केल्या जात आहेत. गंगापूरमध्ये २६ गावे आणि ७ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात असून, ८६ मंजूर खेपांपैकी ७९ खेपा केल्या जात आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ९ गावे व ८ वाड्यांमधील १५,३४६ लोकसंख्येला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. फुलंब्री तालुक्यातही ६ गावांसह वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. कन्नड, खुलताबाद, सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची अद्याप नोंद नाही.
४१ विहिरींचे अधिग्रहण
गावांना टँकर व पाइपलाइनने पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात ४१ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यातील ३७ विहिरींचे अधिग्रहण टँकरसाठी केले असून ४ विहिरींतून पाइपलाइन अथवा इतर मार्गाने पाणीपुरवठा केला जात असल्याचे अहवालात नमूद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.