
छत्रपती संभाजीनगर : ऐन सणासुदीच्या काळातही शहरातील पाणीटंचाई कायम असून, बुधवारी (ता. चार) सलग दुसऱ्या दिवशी फारोळा येथे वीजपुरवठा खंडित झाल्याचा प्रकार घडला. त्यामुळे चार तास शहरात येणारे पाणी बंद होते. परिणामी अनेक भागांत उशिराने पाणी देण्यात आले तर काही भागाला एक दिवस विलंबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे.