Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये अकस्मात मृत्यू नव्हे, खून! दारूच्या गुत्त्यावर दोन मित्रांनी मारहाणीत घेतला मित्राचा जीव
Chh. Sambhajinagar : शहाबाजार येथील दारूच्या अड्ड्यावर १६ एप्रिल रोजी झालेल्या घटनेत शेख समी याचा मित्रांनी मारहाणीत खून केल्याचे शवविच्छेदन अहवालानंतर निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : सुरवातीला तरुणाचा अकस्मात वाटणारा मृत्यू, शवविच्छेदनानंतर खून असल्याचे निष्पन्न झाले आहे. १६ एप्रिलला हा प्रकार शहाबाजार भागातील अवैध दारूच्या गुत्त्यावर घडला होता.