छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या आठ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या आठ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
Published on: 
छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या आठ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड व्हॉलीबॉल संघांनी राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावले उपविजेतेपद --------------- धाराशिव, ता. ५ ः छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १४ आणि १७ वर्षांखालील मुलांच्या संघांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने मिणचे (जि. कोल्हापूर) व दहिवली (जि. रत्नागिरी) येथे आयोजित शालेय राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. १७ वर्षे वयोगटातून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या श्रेयश खांडेकर याला मालिकावीराच्या पुरस्काराने सन्मानित केले. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी धाराशिवच्या एकूण ८ खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. १७ वर्षांखालील गटात श्रेयश खांडेकर, आयुष खडके, गायत्री नांदे व संस्कृती गाढवे, तर १४ वर्षांखालील गटात अनुज खडके, शिवम सूर्यवंशी, श्रद्धा जाधव व समृद्धी गाढवे या खेळाडूंची निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना क्रीडाशिक्षक संजय देशमुख यांचे मार्गदर्शन, तर शैलेश पाचभाई, आशुतोष माने, सुमित जाधव व जयराम गीते यांचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा शशिकला घोगरे, कार्याध्यक्ष एम. डी. देशमुख, उपाध्यक्ष ॲड. अविनाशराव देशमुख, सचिव धनंजय पाटील, प्राचार्य व्ही. के. देशमुख व इतर मान्यवरांनी यशस्वी खेळाडूंचा सत्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.