भोकरदन-जाफ्राबादमधील ३६ शेतरस्त्यांना प्रशासकीय मंजुरी पाणंद रस्त्यांचा मार्ग मोकळा;

भोकरदन-जाफ्राबादमधील ३६ शेतरस्त्यांना प्रशासकीय मंजुरी पाणंद रस्त्यांचा मार्ग मोकळा;
Published on: 
छत्तीस पाणंद रस्त्यांना प्रशासकीय मंजुरी उर्वरित प्रस्ताव तातडीने मार्गी लावा; आमदार संतोष दानवे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश भोकरदन, ता.८ (बातमीदार) : भोकरदन-जाफराबाद विधानसभा मतदारसंघातील ३६ शेत व पाणंद रस्त्यांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणे आणि शिवारात दळणवळण करणे सुलभ होणार आहे. उर्वरित प्रस्तावित रस्त्यांच्या मंजुरीची प्रक्रियाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार संतोष दानवे यांनी शुक्रवारी (ता. सहा) तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिले. मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना क्षेत्रीय समितीच्या कामकाजाचा आढावा घेताना मंजूर ३६ रस्त्यांच्या कामांना गती देण्यावर भर देण्यात आला. शेतमाल थेट बाजारपेठेपर्यंत पोचविण्यासाठी शेतरस्ते महत्त्वाचे असल्याने उर्वरित प्रस्तावांबाबतही तातडीने कार्यवाही करण्याचे आमदार दानवे यांनी स्पष्ट केले. यावेळी शेतकरी कर्जमाफी, कर्जपुनर्रचना आणि नवीन पीककर्ज वाटपाचाही आढावा घेण्यात आला. कागदपत्रांच्या त्रुटी व तांत्रिक कारणे पुढे करून शेतकऱ्यांना बँकांचे हेलपाटे मारायला लावू नका,असा सज्जड इशारा दानवे यांनी बँक प्रशासनाला दिला. पात्र शेतकऱ्यांना कोणतीही दिरंगाई न करता पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. बैठकीस उपविभागीय अधिकारी कार्तिक पाणीग्रही, तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर, गणेश ठाले, विष्णू रोडगे, श्रीकृष्ण वेणीकर, अमोल शिंदे यांच्यासह समिती सदस्य, सर्व राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.