Chh. Sambhaji Nagar डंपरने विद्यार्थ्याला चिरडले ; दुसरा गंभीर जखमी ; समर्थनगरातील सावरकर चौकात घटना

पोलिस निरीक्षक पाटील आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मृत उमेश आणि त्याचा मित्र ओमराजे हे दोघे विवेकानंद महाविद्यालयाकडून येत होते.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर - मित्रासोबत दुचाकीवर जाणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने चिरडले. ही घटना मंगळवारी (ता.३) दुपारी दोन वाजता समर्थनगरातील सावरकर चौकात घडली. यात विद्यार्थी जागीच ठार झाला. उमेश विश्वासराव शिंदे (वय १८, रा. झाल्टा फाटा) असे ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर ओमराजे एकनाथ गोपाळ (१८, रा. शेंद्रा परिसर) असे गंभीर जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. तसेच अजय मिलिंद बेडेकर (३०, रा. जयभवानीनगर, गल्ली क्र. तीन) असे डंपरचालकाचे नाव असून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती क्रांती चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष बी. पाटील यांनी दिली.

पोलिस निरीक्षक पाटील आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मृत उमेश आणि त्याचा मित्र ओमराजे हे दोघे विवेकानंद महाविद्यालयाकडून येत होते. तर वरद गणेश मंदिराकडून समर्थनगराकडे भरधाव वेगात डंपर जात होता. सिग्नलवर डंपरच्या चाकाखाली उमेशची दुचाकी आली. त्यात उमेशला डंपरने अक्षरशः फरफटत नेले.

यात उमेशचा जागीच मृत्यू झाला. तर ओमराजेने दुचाकीवरून उडी घेत मित्राला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत तो चिरडला गेला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रिक्षाने घाटीत हलविण्यात आले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

याप्रकरणी मृत उमेशच्या मित्राच्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत डंपर चालकाविरोधात क्रांती चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचेही निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

sambhaji nagar
Chh. Sambhaji Nagar : शेकडो रिक्तपदांमुळे आरोग्य यंत्रणा जर्जर ; दोन ‘मल्टिस्पेशालिटी’चा प्रस्ताव शासनाने गुंडाळला

वडील, वृद्ध आजीने फोडला टाहो

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच मृत उमेश याच्या आजीने मला लेकराला बघायचंय म्हणत सूर लावला, मात्र आजीच्या वयाकडे बघून त्यांना उमेश मृत झाल्याचे सांगण्यात आले नव्हते. मात्र, आजीने नातू उमेशला बघायचेच अशी भूमिका घेतल्याने अखेर घाटीत त्यांना आणण्यात आले असता, तिथे रडत बसलेल्या लेकाकडे (उमेशचे वडील) पाहून आजीने टाहो फोडला. आईला बघून उमेशचे वडील आणि मित्रांनीही टाहो फोडल्याने यावेळी उपस्थितांचे डोळेही पाणावले होते.

sambhaji nagar
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

कचरा वाहतुकीचे प्रत्येक वाहन असते भरधाव

शहरात कचरा वाहतूक करणारे लहान, मोठे मिळून जवळपास सातशे ते आठशे वाहने आहेत. यातील एकही वाहन कमी वेगात धावताना दिसत नाही. अगदी गल्लोगल्लीतूनही कचरा वेचणारे छोटा हत्ती वाहन वेगात दामटतात, अनेकदा कचरा टाकण्यासाठी आलेल्या महिलांसोबत लहान लेकरंही असतात. सिग्नल जवळ आल्यानंतरही डंपरचा वेग का कमी झाला नाही, असा सवाल प्रत्यक्षदर्शींनी केला होता.

sambhaji nagar
Pune News : पुण्यातील ससूनमधून पळालेल्या ड्रग्स पेडलर प्रकरणी धक्कादायक माहिती समोर; पुणे पोलिसांनी...

साडेबारा वाजता आम्ही नाश्ता केला होता’

उमेश खूप मनमिळाऊ स्वभावाचा होता. आम्ही मित्रांनी मिळून साडेबारा वाजता नाश्ता केला होता, पण असे काही घडेल असे वाटले नव्हते, असे म्हणत मित्राने घाटीत अश्रूला वाट मोकळी करून दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com