Chhatrapati Sambhajinagar: संतप्त रिक्षाचालक उतरले रस्त्यावर ; गॅससाठी रात्रीपासून रांगा लावाव्या लागल्याने संताप; पोलिसांनी केली मध्यस्थी

Night-Long Queues Lead to Driver Frustration: चिकलठाणा परिसरात रिक्षाचालकांना गॅससाठी रात्रीपासून रांगा लावाव्या लागल्याने संताप झाला. पंप उघडायला विलंब झाल्याने त्यांनी रस्त्यावर उतरून ‘रस्ता रोको’ केला.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

चिकलठाणा परिसर: रिक्षात गॅस भरण्यासाठी रात्रीपासून रांगा लावल्या. त्यात शुक्रवारी ( ता.२७ ) चिकलठाण्यातील चालकाने पंप उघडायला आणखी तास, दोन तास लागणार असल्याचे सांगितल्याने रिक्षाचालक संतापले. त्यांनी थेट ‘रास्ता रोको’ सुरू केला. यामुळे वाहनाच्या रांगा लागायला सुरवात झाली. तेवढ्यात एमआयडीसी सिडको पोलिस तेथे दाखल झाले. त्यांच्या मध्यस्थीने तणाव निवळला. पंपही सुरू झाल्याने लगेच रिक्षाचालकांनीही समजूतदारपणा दाखवला. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com