
छत्रपती संभाजीनगर : अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर शाखाध्यक्षपदी ज्येष्ठ बालसाहित्यकार प्रा. लीला शिंदे यांची निवड झाली. शाखेच्या सल्लागार डॉ. छाया महाजन, उपाध्यक्ष प्रशांत गौतम, सचिव डॉ. विनोद सिनकर यांच्या हस्ते डॉ. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.