CID Investigation : खोतकर एन्काउंटर प्रकरणाचा ‘सीआयडी’ तपास सुरू; साजापूर येथील घटनास्थळाचा पंचनामा, मृतदेह ताब्यात घेत अंत्यविधी
Amol Khotkar Encounter : अमोल खोतकर यांचा एन्काउंटर प्रकरणाचा तपास गृह विभागाच्या आदेशानंतर गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला आहे. चकमकीच्या ठिकाणी CID ने पंचनामा करून तपास सुरु केला असून, मृत्यू झालेल्या अमोलचे अंत्यसंस्कार ३६ तासांनंतर पार्थिवावर करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर : अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे. ‘सीआयडी’च्या पथकाने बुधवारी (ता. २८) साजापूर येथील घटनेचा पंचनामा करीत तपासाला सुरवात केली.