
सातारा परिसर : गावालगत खंडोबा मंदिर रोड, भारत बटालियन, श्रेयस कॉलेज, मल्हार चौक येथे ड्रेनेज चोकअप होऊन घाण पाणी रस्त्यावर येते. यातून मार्ग काढत प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर आली. मनपा अधिकारी केवळ पाहणी करून गेले. मात्र, समस्या कायम राहिल्याने वैतागलेल्या नागरिकांनी रस्त्यात बेशरमाची झाडे लावत मनपाचा निषेध केला.