मुंबईतील आंदोलनानंतर शहर पोलिस सतर्क

शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु
City police alert after Mumbai agitation aurangabad
City police alert after Mumbai agitation aurangabadsakal

औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या घरावर आंदोलन केल्याच्या घटनेनंतर एसटीच्या स्थानिक आंदोलनकर्त्यांच्या हालचालींवर पोलिसांनी लक्ष ठेवले आहे. दुपारपर्यंत मध्यवर्ती बसस्थानकात ठाण मांडून बसल्यानंतर सायंकाळी मात्र बहुतांश कर्मचाऱ्यांचे फोन बंद होते.

शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संदर्भात गुरुवारी (ता. सात) उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर मागण्या मान्य झाल्याचा दावा करीत एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यवर्ती बसस्थानकात गुलाल उधळून जल्लोष केला होता. मात्र, शुक्रवारी (ता. आठ) मुंबईमध्ये कर्मचाऱ्यांनी श्री. पवार यांच्या घरासमोर आंदोलन केल्याच्या घटनेनंतर एसटी कर्मचाऱ्यांमधील वातावरण बदलून गेले. दुपारी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या भूमिकेवरच पुढील दिशा ठरेल, असे सांगणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांनी सायंकाळी मोबाईल बंद करुन ठेवले होते, तर अनेकजण फोन उचलत नव्हते. मात्र या घटनेच्या अनुशंगाने शहरात पडसाद उमटू नयेत म्हणून पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मुंबई येथील आंदोलनाच्या अनुशंगाने शहरातील वातावरण शांत आहे. कर्मचाऱ्यांचा कुठलाही आक्रमक पवित्रा आपल्याकडे नाही. मात्र पोलिसांचे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या हालचालीवर बारीक लक्ष आहे.

-डॉ. गणपत दराडे, पोलिस निरीक्षक, क्रांती चौक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com