अंबडच्या वर्ग एकच्या अधिकाऱ्याने घेतली लाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bribe crime

अंबडच्या वर्ग एकच्या अधिकाऱ्याने घेतली लाच

जालना / औरंगाबाद - तक्रारदार शेतकऱ्याच्या वडीलांच्या नावावर असलेल्या बाधित जमिनीचा सुधारित भुसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यासाठी अंबड जलसंधारण विभागातील वर्ग एकच्या अधिकाऱ्याने २० हजार रुपयांची लाच घेतली. याप्रकरणी लाचलूचचपत प्रतिबंधत विभागाच्या (एसीबी) औरंगाबाद विभागाने सापळा रचून लाचखोर अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या ही कारवाई १८ जुलै रोजी कार्यालयाजवळच रुचिरा हॉटेल येथे करण्यात आली. भगवान विठ्ठलराव राऊत (५६, रा. सी-४, एन-चार, सिडको, औरंगाबाद) असे त्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून तो अंबड (जि. जालना) येथील मृद व जलसंधारण कार्यालयात उपविभागीय जलसंधारण अधिकारीपदी कार्यरत आहे.

याप्रकरणी तक्रारदाराच्या वडिलांची मोहपूर (ता. घनसावंगी, जि. जालना) येथे चार हेक्टर ९० आर इतकी जमीन होती. त्यापैकी २ हेक्टर ८८ आर जमीन साठवण तलावात संपादित झाली होती. उर्वरित २ हेक्टर २ आर जमिनीत तलावाचे पाणी येत असल्याने बाधित होत आहे, कोणतेही पीक येत नाही, संयुक्त मोजणीनुसार सदरील जमिनीपैकी ७० आर जमीन बाधित झाल्याचा मोजणी अहवालनुसार सुधारित भुसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे पाठविण्यासाठी भगवान राऊत याने ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती २० हजार रुपये लाचपोटी देण्याचे ठरले, परंतू लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने तक्रारीची शहानिशा केली असता, लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान एसीबीने १८ जुलै रोजी सापळा लावला असता राऊत याने कार्यालयाजवळच रुचिरा हॉटेल येथे २० हजार रुपयांची लाच घेतली, त्यावेळी त्याला बेड्या ठोकण्यात आल्या असून त्याच्याविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. ही कारवाई एसीबीच्या निरीक्षक तथा सापळा अधिकारी अनिता इटूबोने, समन्वय अधिकारी पोलिस निरीक्षक हनुमंत वारे यांनी केली. त्यांना विलास चव्हाण, साईनाथ तोडकर, सुनिल पाटील, शिरिष वाघ, सी. एन. बागुल यांनी सहाय्य केले.

Web Title: Class I Officer Of Ambad Took Bribe Beed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top