औरंगाबाद : ढगाळ वातावरणाचा फटका : मका खरेदी केंद्रे बंद

काही दिवस मका विक्रीसाठी आणू नये, बाजार समितीचे शेतकऱ्यांना आवाहन
ढगाळ वातावरणाचा फटका : मका खरेदी केंद्रे बंद
ढगाळ वातावरणाचा फटका : मका खरेदी केंद्रे बंद

वैजापूर : तालुक्यात मका खरेदीतून दररोज करोडो रुपयांची उलाढाल असते. मात्र, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अवकाळीचा फटका मका खरेदी केंद्रावर केव्हाही बसू शकतो, याची धास्ती सध्या व्यापाऱ्यांना आहे. दरम्यान, बुधवारी (ता.१) तालुक्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी सुरु असल्याने तालुक्यातील सर्व मका खरेदी केंद्र गुरुवारपासून काही दिवसासाठी बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी आणू, नये असे आवाहन बाजार समितीने केले आहे.

तालुक्यात बाजार समितीने तीन ठिकाणी मका खरेदी केंद्र सुरु केले आहे. त्यामुळे दररोज वैजापूरच्या खरेदी केंद्रावर १०० ते१२५, शिऊर केंद्रावर ५० ते ६० व वाकला खरेदी केंद्रावर ३० ते ४० असे दिवसातून २०० ते २५० ट्रॅक्टर मका शेतकरी विक्रीसाठी केंद्रावर आणतात.

ढगाळ वातावरणाचा फटका : मका खरेदी केंद्रे बंद
जळगाव : हिरापूरजवळ भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

मात्र, बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण व बऱ्याच ठिकाणी दिवसभर पावसाच्या हलक्या सरी सुरु असल्याने मका खरेदी केंद्रांवरही व्यापाऱ्यांची व शेतकऱ्यांची शेतमाल झाकताना तारांबळ उडाली. शिवाय खरेदी करून ठेवलेला मालही झाकण्यासाठीही व्यापाऱ्याना कसरत करावी लागली. अनेक ठिकाणी मकाचे पोते ओले झाल्याचे सांगण्यात आले. यातही शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना नुकसान सोसावे लागले.

ढगाळ वातावरणामुळे गव्हावर मावा

तालुक्यासह शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून बुधवारी (ता.१) तर दिवसभर पावसाचा शिडकावा सुरु होता. वातावरणातील गारव्याने जनजीवन विस्कळित झाले होते. बुधवारी खुलताबादच्या आठवडी बाजाराचा दिवस होता. मात्र, बाजारात जेमतेम वर्दळ राहिली. या अवेळी ढगाळ वातावरणाबरोबरच, बोचर्या वाऱ्यामुळे गहु, हरभरा या पिकांवर मावा, तुडतुडा, बोंडआळीचा प्रादुर्भाव होणार असून वातावरण असेच राहिल्यास रब्बी हंगामात पुन्हा लावलेले मका पीकही धोक्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com