
छत्रपती संभाजीनगर : राज्याचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका विवाह सोहळ्यासाठी शुक्रवारी शहरात आले होते. यावेळी मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले आमदार त्यांच्या पंगतीला बसल्याचे दिसून आले. दुसरीकडे शिंदे गटातील मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री येण्याआधीच बाहेर पडल्याने त्यांचे ‘टायमिंग’ मात्र चुकले.