Rain Damage : राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून भरपाई देण्याचे निर्देश दिले असून, मंत्रिमंडळ बैठकीत आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला.
मुंबई : राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा मंगळवारी राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.