एसआयआरविरोधी आंदोलनातील ताब्याच्या निषेधार्थ परभणी काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

एसआयआरविरोधी आंदोलनातील ताब्याच्या निषेधार्थ परभणी काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Published on: 
विरोधी खासदारांना ताब्यात निषेधार्थ काँग्रेसचे निवेदन ---------- सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. ८ ः दिल्ली येथे ‘एसआयआर’विरोधात आंदोलन करणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, विविध विरोधी पक्षांच्या खासदारांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेसतर्फे बुधवारी (ता. सात) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मुंबईतील प्रदेश काँग्रेस समितीच्या टिळक भवन कार्यालयात पोलिसांनी प्रवेश करून आदिवासी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याच्या घटनेची स्वतंत्र, निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली. दिल्लीत शांततामय आंदोलनादरम्यान झालेली ही कारवाई लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. दरम्यान, पाच ऑक्टोबर रोजी मुंबईतील टिळक भवनात पोलिसांनी प्रवेश करून आदिवासी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याच्या घटनेवरही काँग्रेसने आक्षेप नोंदविला. पोलिसांनी पक्ष कार्यालयात कोणत्या अधिकाराने प्रवेश केला, कारवाईचे आदेश कोणी दिले आणि विद्यार्थ्यांना कोणत्या कायदेशीर कारणास्तव ताब्यात घेण्यात आले याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. दोन्ही घटनांची तातडीने, पारदर्शक, स्वतंत्र आणि वेळबद्ध चौकशी करावी, कायद्याचे उल्लंघन आढळल्यास संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, चौकशीचा अहवाल सार्वजनिक करावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. तुकाराम रेंगे पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, अनुसूचित जाती विभागाचे सचिव सुहास पंडित, गटनेते अजित वरपूडकर, रवी सोनकांबळे, अतिकउर रहेमान, सत्तार इनामदार, खदिरलाला हाश्मी, तब्बू पटेल, प्रसाद डुकरे, अमीर खान पठाण, अंगद सोगे, आर. एस. देशमुख, शेख खाजा शेख महबूब यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com