ग्राहकाचे हक्क आणि तक्रारीची सोय

ग्राहकाचे हक्क आणि तक्रारीची सोय
Published on
कोर्ट टुडे २ (((( ग्राहक संरक्षण कायदा )))) .... फसवणूक झाली म्हणून गप्प बसू नका वकील नको, कोर्टाचे हेलपाटे नको; ऑनलाइन तक्रार नोंदवून मिळवा हक्क आपण बाजारातून एखादी वस्तू खरेदी करतो, जसे की मोबाइल रिचार्ज करणे, विमा काढतो काढणे, बँकचे व्यवहार, हॉस्पिटलमध्ये उपचार घेतो किंवा ऑनलाइन खरेदी करतो. पैसे देऊनही वस्तू खराब मिळाली, सेवा नीट मिळाली नाही किंवा चुकीची माहिती देऊन किंवा चुकीची जाहिरात करून  आपली फसवणूक झाली, तर अनेकजण कुठे जायचे?  या प्रश्नामुळे शांत बसतात. प्रत्यक्षात ग्राहक संरक्षण कायदा अशा ग्राहकाला कायदेशीर मार्ग उपलब्ध करून देतो. १) ग्राहक कोण असू शकतो? : ग्राहक संरक्षण अधिनियम, २०१९ नुसार, एखादी वस्तू किंवा सेवा मोबदला देऊन स्वतःच्या वापरासाठी घेणारी व्यक्ती ग्राहक होऊ शकते. मात्र पुनर्विक्री किंवा व्यावसायिक कामासाठी वस्तू किंवा सेवा घेणाऱ्या व्यक्तीस सामान्यतः ग्राहक म्हणता येणार नाही. स्वतःच्या वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू  कायद्यात ‘ग्राहक’ या व्याख्येमध्ये ग्राह्य धरल्या जातात. २) तक्रार कोणत्या कारणासाठी? : सदोष वस्तू, सेवेत त्रुटी, जास्त किंमत आकारणे, चुकीची किंवा दिशाभूल करणारी जाहिरात, अनुचित व्यापार पद्धती किंवा ग्राहकाच्या हक्कांवर परिणाम करणाऱ्या इतर बाबींविरुद्ध तक्रार करता येते. ३) तक्रार कुठे करायची? : प्रकरणाच्या आर्थिक मूल्यावर आणि लागू असलेल्या अधिकारक्षेत्रानुसार जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय ग्राहक आयोगासमोर तक्रार करता येते. ग्राहकाला स्वतः तक्रार दाखल करता येते; वकील करणे बंधनकारक नाही. ऑनलाइन पद्धतीने तक्रार दाखल करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. ग्राहक www.ejagriti.com वर आपली तक्रार दाखल करू शकता. ४) कोणते पुरावे हवेत? : तक्रार करताना खरेदीचे बिल, पावती, वॉरंटी कार्ड,  पेमेंटचा पुरावा, ई-मेल, फोटो, व्हिडिओ आणि संबंधित पत्रव्यवहार जतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आधी संबंधित कंपनी किंवा सेवा देणाऱ्याकडे लेखी तक्रार करून त्याची प्रत ठेवणेही उपयोगी ठरते. ज्यामुळे न्यायालयासमोर आपण तक्रार निवारण करण्यासाठी प्रयत्न केले हे सिद्ध करता येते. – ॲड. अमोल वाघमारे ९०६७१२९२२२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com