
छत्रपती संभाजीनगर : हरिजन शब्दाचा वापर केल्यावरून माजी खासदार इम्तियाज जलील चांगलेच अडचणीत आले असून शुक्रवारी (ता. ४) रात्री पोलिसांनी त्यांना नोटीस बजावण्याचा प्रयत्न केला. इम्तियाज जलील यांनी नोटीस स्वीकारण्यास नकार देत, जी कारवाई करायची ती करा असे सांगत पोलिस अधिकाऱ्यांना परतवून लावले.