Chh. Sambhajinagar News: भाजीपाला, फळांच्या सालीपासून आरोग्यदायी कुकीज; डॉ. श्रुतिका देव यांच्या संशोधनाला मिळाले पेटंट
Fruit Peel Cookies: फळे आणि भाजीपाल्याच्या सालींपासून आरोग्यदायी कुकीज बनवण्याची अभिनव पद्धत डॉ. श्रुतिका देव यांनी विकसित केली.या संशोधनाला भारतीय पेटंट कार्यालयाने मान्यता दिली असून, हे पेटंट २० वर्षांसाठी वैध आहे.
छत्रपती संभाजीनगर : फळे किंवा भाजीपाल्याच्या सालीपासून कुकीज तयार करण्याची प्रक्रिया शहरातील प्राध्यापिकेने विकसित केली आहे. एमजीएम विद्यापीठाच्या प्रा.डॉ. श्रुतिका देव यांना या संशोधनासाठी भारतीय पेटंट कार्यालयाकडून पेटंट जाहीर झाले आहे.