निर्बंध मार्चमध्ये कमी होणार; राजेश टोपेंनी दिली माहिती | Corona Restrictions | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

  Rajesh Tope

निर्बंध मार्चमध्ये कमी होणार; राजेश टोपेंनी दिली माहिती

जालना : राज्यात कोरोनाची तिसरी लाट कमी झाली. नवीन बाधितांची संख्याही नियंत्रणात आहे. त्यामुळे मार्चमध्ये राज्यातील निर्बंध मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. शिवाय केंद्र शासनाकडूनसुद्धा राज्याला निर्बंध कमी करण्यासंदर्भात पत्र आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी (ता.१९) येथे पत्रकारांना दिली.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, ‘‘राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यानंतर रोज ४८ हजारांपर्यंत कोरोना रुग्ण आढळून येत होते. परंतु, आजघडीला रोज दोन हजारांपेक्षाही कमी रुग्ण राज्यात आढळून येत आहेत. शिवाय कोरोनामुळे होणारे मृत्यूही थांबले आहेत. राज्यात लसीकरणसुद्धा वेगाने झाले असून, आतापर्यंत ९३ टक्के टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

हेही वाचा: यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा भरारी पथकात आरोग्य विभागाचा समावेश

६७ ते ६८ टक्क्यांपर्यंत कोरोना लसीकरणाचा दुसरा डोसही पूर्ण झाला आहे. शिवाय १५ व १८ वयोगटातील मुलांचे ५७ टक्के लसीकरण झाले आहे. या सर्वांचा सकारात्मक परिणाम हा निर्बंध कमी करण्यावर होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कलदेखील निर्बंध कमी करण्याचा आहे; तसेच केंद्राकडूनही कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात पत्र आले आहे. त्यामुळे मार्च महिन्यात परिस्थिती पाहून हॉटेल, विवाहा सोहळा, नाट्यगृह, सिनेमागृह आदी ठिकाणचे निर्बंध मोठ्या प्रमाणावर कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

Web Title: Corona Restrictions To Be Reduced In March Rajesh Tope

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top