esakal | Corona Updates: औरंगाबाद जिल्ह्यात ६७ नवीन कोरोना रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona 1

आता जिल्ह्यातील कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ४२ हजार १७४ आहे.

Corona Updates: औरंगाबाद जिल्ह्यात ६७ नवीन कोरोना रुग्ण

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात मागील 24 तासांत 67 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४४ हजार १२४ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील रिकव्हरी रेट दिवसेंदिवस चांगला होत आहे. गेल्या 24 तासांत १२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ४२ हजार १७४ आहे.

सध्या ७९० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अंतरवाली, राठी (जि. जालना) येथील ४५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत एक हजार १६० जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील बाधित-
परिसर (कंसात रुग्णसंख्या)- महापालिका हद्दीत मोंढा नाका (१), इटखेडा (२), पुंडलिकनगर, गारखेडा (१), अहिंसानगर (१), एन-९ रायगडनगर (१), एन-२ जयभवानी नगर (१), एन-२ रामनगर (२), दर्गा चौक (१), सातारा परिसर (२), देवळाई परिसर (१), पडेगाव (२), पदमपुरा (१), गणेशनगर, गारखेडा (२), पोतदार इंग्लिश स्कूल (१), गारखेडा (२), खडकेश्वर (१), एन-७ सिडको (१), शिवाजीनगर (१), आविष्कार कॉलनी (१), घाटी परिसर (१), शिल्पनगर (१), उस्मानपुरा (१), वेदांतनगर (१), टी.व्ही. सेंटर (१), समर्थनगर (१), मुकुंदनगर (१), अन्य (२१).

ग्रामीण भागातील रुग्ण: कन्नड (१), अन्य (१३)

(edited by- pramod sarawale)

loading image