
Aurangabad : औरंगाबादेत आज फक्त तीनशे जणांना मिळणार लस
औरंगाबाद : शहरात Aurangabad सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. ३०) कोरोना प्रतिबंधक लसींचा Corona Vaccination Shortage तुटवडा आहे. महापालिकेला Aurangabad Municipal Corporation शासनाकडून अद्याप लसींचा साठा प्राप्त झाला नसल्याने शिल्लक असलेल्या केवळ तिनशे लसी नागरिकांना दिल्या जातील, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. शहरात पुन्हा एकदा लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. रविवारी महापालिकेला १२ हजार लसी मिळाल्या होत्या. त्यानंतर एकही लस शासनाकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे मंगळवारी व बुधवारी (ता. ३०) लसीकरणावर परिणाम झाला आहे. गेल्या आठवड्यात महापालिकेकडे ५० ते ६० हजार लसींचा मुबलक साठा होता. त्यातून मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आले. परंतु आता लसीकरणाच्या मोहिमेला ब्रेक लागला आहे. लसीकरणाबद्दल डॉ.पाडळकर यांनी सांगितले की, कोव्हीशिल्डच्या तिनशे लसी शिल्लक आहेत. त्यातून उद्या लसीकरण केले जाईल. वॉक-इन आणि कारमधून आलेल्या व्यक्तींसाठी प्रोझोन मॉलच्या पार्किंगच्या जागेत लसीकरण केले जाईल.corona vaccination in aurangabad only 300 vaccine doses available
तिनशे जणांना टोकन दिले जाईल. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये. मंगळवारी ४३० जणांना कोव्हीशिल्ड लस देण्यात आली. तसेच कोव्हॅक्सिन लसीच्या केवळ दुसऱ्या डोससाठी क्रांती चौक आरोग्य केंद्र, राजनगर आरोग्य केंद्र आणि एमआयटी हॉस्पिटल सिडको एन- ४ या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.