esakal | औरंगाबाद महापालिकेला मिळाल्या ६ हजार लसी, आज ४० केंद्रांवर लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

औरंगाबाद महापालिकेला मिळाल्या ६ हजार लसी, आज ४० केंद्रांवर लसीकरण

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेला कोविशिल्डच्या सहा हजार लसी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार शनिवारी शहरातील ४० केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. ३४ केंद्रांवर नागरिकांना केवळ दुसरा डोस मिळेल तर पाच केंद्रावर पहिला डोस मिळेल. पहिल्या डोससाठी ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

ही आहेत केंद्रे

कोविशिल्ड (केवळ दुसरा डोस)
भीम नगर, गरम पाणी, आरेफ कॉलनी, सत्य विष्णू हॉस्पिटल हर्ष नगर, जिन्सी रिंगटीपुरा, बाजीपुरा, गांधीनगर, नेहरूनगर, हर्सुल, आयएमए हॉल, जव्हार कॉलनी, पिर बाजार चिकलठाणा, नारेगाव, जुना बाजार, नक्षत्रवाडी, सिल्क मिल कॉलनी, सिडको एन-८, सिडको एन-११, विजय नगर, एमआयटी कॉलेज, मातोश्री मीराताई रामराव शिंदे आरोग्य केंद्र मसणतपूर, शिवाजी नगर, मुकुंदवाडी, छावणी, औरंगपुरा, इएसआयस हॉस्पिटल, भवानीनगर, बन्सीलाल नगर, एन-२ समाज मंदिर, न्यू इंग्लिश स्कूल आयप्पा मंदिरा जवळ, महापालिका शाळा जिजामाता कॉलनी, पंडित दीनदयाल उपाध्याय आरोग्य केंद्र पुंडलिक नगर, गुरुकुल शाळा राजनगर.

हेही वाचा: उस्मानाबादेत कारच्या भीषण अपघातात निवृत्त न्यायाधीशाचा मृत्यू

कोविशिल्ड (पहिला डोस)
-सादात नगर, कैसर कॉलनी चेतना नगर, शहाबाजार, गणेश कॉलनी.

ड्राईव्ह इन व्हॅक्सिन (वाहनांमध्ये लसीकरण)
-प्रोझोन मॉल पार्किंग लसीकरण केंद्र.

loading image