'कोरोना योद्धांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत'

कोरोना योद्धांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा इशारा
sunil chavan
sunil chavansunil chavan
Updated on

बिडकीन/औरंगाबाद: कोरोना संसर्गाच्या महामारीत दिवस रात्र मेहनत घेऊन डॉक्टर, सिस्टर आणि आरोग्य यंत्रणा गेल्या वर्षभरापासून अविरत काम करत आहेत. त्यामुळे नागरिका, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. कोरोना योद्धांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत, असा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला. ग्रामीण रुग्णालयांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बिडकीन ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गोरे यांच्यावर रुग्णालयात फाद हुसैन चाऊस याने हल्ला केला होता. यापार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी बिडकीन येथे डॉ. गोरे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः डॉ. संजय गोरे यांना सोबत नेऊन बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

संबंधित संशयित आरोपीला शोधून त्वरित अटक करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिल्या. यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com