शासकीय कापूस नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ

शासकीय कापूस नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ
Published on: 
शासकीय कापूस नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ ---- खुल्या बाजारात मिळतोय चांगला भाव ---- गंगापूर, ता. ३ (बातमीदार) ः तालुक्यात यावर्षी कपाशीची वाढ खुंटली असून, उत्पादनात मोठी घट होणार आहे. असे असतानाही खुल्या बाजारात कापसाला प्रतिक्विंटल नऊ हजारांच्या वर दर मिळत आहे, तर शासकीय केंद्रावर आठ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे (सीसीआय) पाठ फिरविल्याचे चित्र आहे. सोमवार (ता. दोन) पर्यंत गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत शासकीय कापूस खरेदीसाठी केवळ २३ शेतकऱ्यांनीच नोंदणी केली आहे, तर लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत शासकीय कापूस खरेदीसाठी १६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा सर्वच पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, कपाशीची झाडे लहान राहिल्याने एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कापसाची प्रतवारी चांगली असून, कापूस कोरडा असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हंगामाच्या सुरवातीला कापसाची खरेदी नऊ हजार ३०० ते नऊ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने सुरू झाली होती. काही दिवसांपासून खुल्या बाजारात भाव कमी झाले असून, व्यापाऱ्यांकडून कापूस नऊ हजार ते नऊ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला जात आहे. कापसाला लवकरच १० हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला माल घरातच साठवून ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.