Cotton Price : कापसाच्या दराचीही आता उरली नाही शेतकऱ्यांना हमी
Agriculture News : कापसाचे उत्पादन समाधानकारक असले तरी शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळत नसल्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. काही शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्याने कापूस विकावा लागत आहे.
वाळूज : यंदा कापसाचे सरासरी उत्पादन समाधानकारक झाले असले तरी कापसाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे.