कापूस खरेदीसाठी ॲपवर नोंदणी अनिवार्य!

कापूस खरेदीसाठी ॲपवर नोंदणी अनिवार्य!
Published on
कापूस खरेदीसाठी ॲपवर नोंदणी अनिवार्य! ----- शेतकऱ्यांना मिळणार ८,६६७ रुपये हमीभाव; ३१ ऑक्टोबरची डेडलाइन ---- मंठा, ता. २० (बातमीदार) : कापूस हंगाम २०२६-२७ मध्ये भारतीय कापूस महामंडळामार्फत (सीसीआय) किमान आधारभूत किंमत (एमएसपी) अंतर्गत प्रतिक्विंटल ८ हजार ६६७ रुपये दराने कापूस खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ‘कापूस किसान’ मोबाइल ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंदणीशिवाय शासकीय खरेदी केंद्रावर कापूस स्वीकारला जाणार नाही. तसेच ई-पीक पाहणीत कापसाचा पेरा नोंदविलेला असणे आवश्यक आहे. मागीलवर्षी ऑनलाइन नोंदणीअभावी अनेक शेतकरी हमीभावापासून वंचित राहिले. यंदा अशी वेळ येऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीत विशेष नोंदणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. नोंदणीसाठी सातबारा, त्यावर ऑनलाइन कापूस पेरा, आधार कार्ड आणि आधारशी संलग्न मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. सीसीआयच्या सूचनेनुसार, एक सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरदरम्यान नोंदणी करता येणार आहे. नोंदणीनंतर खरेदीची तारीख, केंद्र व पेमेंटची माहिती मोबाइलवर मिळणार आहे. ----- ((कोट)) मंठा तालुक्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अंतिम तारखेची वाट न पाहता तत्काळ नोंदणी करून शासकीय हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा करून घ्यावा. - रमेश बोराडे, सचिव, बाजार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com